आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कागदी ,प्लास्टिक ध्वजाचा वापर करू नका

उपजिल्हाधिकारी संजय तेली यांचे आवाहन

आमचे सर्व अपडेट व्हाटसअप वर मिळवा

कोल्हापूर/प्रज्ञावंत वृत्तसेवा /दि.१३ ऑगस्ट:

    दरवर्षी 15 ऑगस्ट या राष्ट्रीय दिनी तसेच इतर महत्त्वाच्या कार्यक्रमांच्या व क्रीडा आयोजनांच्या दिवशी लहान आकारातील कागदी व प्लास्टिकचे राष्ट्रध्वजाची विक्री होते. शालेय विद्यार्थी ,लहान मुले ,व्यक्ती राष्ट्रभक्ती व उत्साह पोटी हे राष्ट्रध्वज विकत घेतात परंतु, हे ध्वज त्याच दिवशी सायंकाळी अथवा दुसऱ्या दिवशी इतरत्र टाकले जातात त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो, यामुळे कागदी व प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरू नयेत असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी केले आहे. गृह विभागाच्या शासन निर्णयानुसार रस्त्यावर इतरत्र पडलेल्या, खराब झालेल्या व फाटलेल्या ध्वजांचे संकलन करून राष्ट्रध्वज संहितेमध्ये नमूद कार्यपद्धतीनुसार नष्ट करण्यासाठी ग्रामपंचायत नगरपरिषद व महानगरपालिका स्तरावर समित्या स्थापन करण्यात येत आहेत.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.