आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यात सहा जिल्हयात आज मुसळधार पावसाची शक्यता 

कोल्हापूर जिल्ह्यासह सहा जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट 

आमचे सर्व अपडेट व्हाटसअप वर मिळवा

ख.प्रज्ञावंत वृत्तसेवा (दि. २९ जुलै):

राज्यात कोकणासह घाट माध्यावरही दमदार पाऊस लागला असून नद्यांनी आता धोक्याची पातळी गाठली आहे. कोल्हापूर जिल्हयात तर पावसाने हाहाकार माजविला असल्याचे चित्र दिसत आहे. काल दिवसभरात पावसाचा जोर कमी झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीची पातळी सात इंचानी कमी झाली आहे. त्यामुळे कोल्हापूर वासियांना थोडा धीर जाणवला असला; परंतु आज दिवसभरात पुन्हा एकदा कोल्हापूर सह  रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, ठाणे, सातारा आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या सर्व जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांमधील नागरिकांना आज त्रासाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. आज नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असही प्रशासनाने सांगितले आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.