आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दूधगंगा जलाशयात 80 टक्के पणीसाठा 

विद्युत विमोचक युनिट क्र.1 मधून १०००कयुसेक्स इतका विसर्ग सूरू 

आमचे सर्व अपडेट व्हाटसअप वर मिळवा

ख.प्रज्ञावंत वृत्तसेवा/ दि.२६जुलै: 

          कोल्हापूर जिल्ह्यात गेली आठवडाभर पावसाने जोरदार बॅटिंग केली असून  जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे त्यामुळे बरीच बंधारे पाण्याखाली गेली आहेत. राधानगरी तालुक्यातील देखील पावसाचा जोर कायम असून राधानगरी तालुक्यातील प्रसिद्ध असणारे राधानगरी धरण ९७ टक्के भरले असून काल (दि.२५जुलै) रोजी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर जिल्हयातील सर्वात मोठा पाणीसाठा असलेले काळम्मावाडी येथील दूधगंगा जलाशय आज रोजी ८०.२८% भरले आहे.

            आज सकाळी ७:०० च्या अहवालानुसार सध्या धरणातील पाणीपातळी ५७७.३४३घ.द.ल.मी. इतकी आहे. सध्या धरणात २०.३८टीएमसी पाणीसाठा असून काल (दि.२५जुलै) रोजी सकाळी 10वाजून 50मिनिटांनी विद्युत विमोचक युनिट क्र.1 मधून1000 क्यूसेक्स इतका विसर्ग सुरु करणेत आला आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.