आपला जिल्हाताज्या घडामोडी

लाडकी बहीण महाराष्ट्राची योजनेच्या अंमलबजावणीसाठी सावर्डे पा. ग्रामपंचायत कमिटी व स्थानिक प्रशासन कर्मचाऱ्यांची विशेष बैठक संपन्न 

गावातील नागरिकांची होणारी गैरसोय व प्रशासनावर पडणारा ताण कमी करण्यासाठी बैठकीत विशेष चर्चा 

आमचे सर्व अपडेट व्हाटसअप वर मिळवा

 खरा प्रज्ञावंत वृत्तसेवा/दि.०६ जुलै: सध्या संपुर्ण महाराष्ट्रात बहीण लाडकी महाराष्ट्राची या योजनेची चर्चा सुरू आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली असून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्य सरकारकडून सुरू करण्यात आली आहे. या योजनेत महिलांना दरमहिन्याला दीड हजार रूपये मिळणार आहेत. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 31 ऑगस्ट असणार आहे; परंतु त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी सर्वच गावात नागरिकांची चांगलीच तारांबळ उडत आहे. गावच्या ग्रामपंचायत , तलाठी कार्यालयासमोर नागरिकांच्या लांबच – लांब रांगा लागलेल्या दिसून येत आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनावर याचा ताण पडत आहे शिवाय नागरिकांची देखील गैरसोय होताना दिसत आहे.

      नागरिकांची होणारी गैरसोय व प्रशासनावर पडणारा कामाचा ताण कमी करण्याच्या दृष्टीने सावर्डे पाटणकर ग्रामपंचायत कमिटीने गावातील योजनेच्या अंमलबजावणीसाठी असणाऱ्या सर्व प्रशासक वर्गाची बैठक आयोजित केली व गावातील नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले . यामध्ये नागरिकांच्या सोईसाठी गावचे चार भागात विभाजन करून प्रत्येक विभागासाठी एक अंगणवाडी मदतनीस नेमण्यात आली आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना आता योजनेसंदर्भात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील तसेच प्रशासनावरील कामाचा ताण कमी होऊन गावातील जास्तीत जास्त लोकांना या योजनेचा लाभ घेता येईल ,असे मत यावेळी बोलताना गावच्या सरपंच सुमन मोरे यांनी व्यक्त केले.

    ग्रामपंचायत सावर्डे पाटणकर कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीमध्ये गावच्या प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच सुमन मोरे यांसह उपसरपंच सुरेश परीट,सदस्य आनंदा कांबळे , वसंत शेंडगे, गावच्या ग्रामसेविका समिधा पाटील, गावचे तलाठी दिगंबर कांबळे, गावातील अंगणवाडी मदतनीस व आशासेविका त्याचबरोबर ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील युवक मयूर पाटील, सर्जेराव काशिद यांची उपस्थिती होती.

Chief Editor

SHARE

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.