अपघातआपला जिल्हाताज्या घडामोडी

घरावर दरड कोसळल्याने पस्तीस हजार रुपयांचे नुकसान

राधानगरी तालुक्यातील वाघवडे गावातील घटना

आमचे सर्व अपडेट व्हाटसअप वर मिळवा

 वाघवडे/दि .१४ जुलै : राधानगरी तालुक्यात सध्या पावसाचा जोर वाढल्याने नदीच्या पाण्याची पातळी वाढत आहे. शिवाय डोंगर दऱ्यातून पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पावसाचा जोर वाढल्याने राधानगरी तालुक्यातील वाघवडे येथे दोन घरावर दरड कोसळली. यामध्ये ३५ हजाराचे नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली

जाहिरात



आहे.कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. पावसामुळे दरड कोसळण्याची घटना घडू लागले आहेत. दिनकर धोंडीबा सावेकर यांच्या घराचे १० हजार रुपयांचे तर संदीप दगडू वरुटे यांच्या घराचे ३५ हजाराचे नुकसान झाले असून जीवितहानी झालेली नाही. दोन्ही कुटुंबीयांना नातेवाईकांच्या घरी हलवण्यात आले आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.