कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राधानगरी तालुक्यातील नरतवडे येथे उद्या रानभाजी महोत्सवाचे आयोजन

पत्रकार - उत्तम कांबळे (केनवडेकर)

आमचे सर्व अपडेट व्हाटसअप वर मिळवा

राधानगरी/ प्रज्ञावंत वृत्तसेवा/दि.१३ ऑगस्ट:

पावसाळ्यात विविध गुणधर्म असणाऱ्या अनेक वनस्पती उगवतात त्यातील अनेक वनस्पती खाण्या योग्य असतात त्यांना आपण रानभाज्या म्हणून ओळखतो. काही रानभाज्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त व औषधी असतात अशा रानभाज्यांची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन राधानगरी तालुका कृषी विभाग आणि महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने उद्या राधानगरी तालुक्यातील नरतवडे येथे जय भवानी मंगल कार्यालयात सकाळी दहा वाजता करण्यात येणार आहे. या रानभाज्या महोत्सवाचे उद्घाटन राधानगरी भुदरगड आजरा विधानसभेचे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा कृषी अधीक्षक अजय कुलकर्णी, विभागीय कृषी सहसंचालक उमेश पाटील ,विभागीय कृषी अधीक्षक अरुण भिंगारदेवे, आत्माचे प्रकल्प संचालक सौ रक्षा शिंदे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती कृषी अधिकारी श्रुतिका नलवडे यांनी दिली
सौ. नलवडे पुढे म्हणाल्या की, राधानगरी तालुक्यातील आरोग्यप्रति जागरूक असणाऱ्या नागरिकांसाठी व परिसरातील शेतकऱ्यांसाठी कंटोलीची भाजी, मायाळू आंबट चुका, टाकाळा, आंबोशी, भुई आवळी, शेवग्याचा पाला, कर्टोली, पात्री, आंबाडी, केना, करंदे, बांबू, तरोटा, टेळूफुल, आळू, पुदिना अशा अनेक दुर्मिळ व लोप पावत चाललेल्या भाज्या खरेदी करता येणार असून तालुक्यातील शेतकरी,शेतकरी गट, महिला बचत गट या सर्वांनी उपस्थित रहावे व जास्तीत जास्त ग्रामस्थांनी भाज्या खरेदी कराव्यात. आरोग्यवर्धक रानभाज्यांचा आहारात समावेश करावा असे आवाहन ही त्यांनी केले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.