आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नरतवडे येथील रानभाजी महोत्सवाला लोकांचा चांगला प्रतिसाद 

राधानगरी तालुक्यातील पहिल्या अभिनव उपक्रमाला शेतकऱ्यांसह महिला व विद्यार्थ्यांनी ही लावली हजेरी

आमचे सर्व अपडेट व्हाटसअप वर मिळवा

खरा प्रज्ञावंत वृत्तसेवा/दि.14ऑगस्ट:

कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यातील नरतवडे येथे रानभाज्या महोत्सव पार पडला असून राधानगरी तालुक्यातील अशा या पहिल्या – वहिल्या अनोख्या उपक्रमाला लोकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

विविध रणभाज्यांची माहिती घेताना आमदार प्रकाश आबिटकर व विविध क्षेत्रातील मान्यवर

या उपक्रमात राधानगरी तालुक्यातील जवळपास १०५ गावातील नागरिकांनी सहभाग दर्शवला होता.आमदार प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून आणि राधानगरी तालुका कृषी विभाग आणि आत्मा विभाग, कृषी विज्ञान केंद्र तळसंदे व स्वर्गीय सुशिलादेवी आबिटकर फौंडेशनच्या यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या रानभाज्या महोत्सवात 100 पेक्षा अधिक रानभाज्यांचा समावेश होता.

      यामध्ये अमरकंद, अळंबी, अघाडा, उळशाचा मोहर, कडकिंदा, कडूकंद, करटोली, काटे-माठ, कुड्याची फुलेकुर्डू, कुसरा, कोळू, कोलासने, कोवळे बांबू, कोळू, गोमाठी, घोळ, चवळीचे बोके, चाईचा मोहर अश्या औषधी वनस्पती, फळभाज्या फुलभाज्या यांचा समावेश करण्यात आला होता.

महोत्सवात सहभागी झालेल्या सावर्डे पाटणकर गावातील महिला

या महोत्सवाला पंचक्रोशीतील शाळा महाविद्यालय यांच्यासह अनेक बचत गट आणि नागरिकांनी मोठा प्रतिसाद नोंदवला . रानभाज्यांमध्ये विविध प्रकारचे जीवनसत्व असतात.  या महोत्सवात आमदार आबिटकर यांच्यासह कृषी क्षेत्राबरोबरच विविध विभागातील पदाधिकाऱ्यांची ही उपस्थिती होती.या महोत्सवात बोलताना आमदार आबिटकर म्हणाले,

महोत्सवात आपले मनोगत व्यक्त करताना आमदार प्रकाश आबिटकर

“आपल्या निसर्ग संपन्न राधानगरी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर औषधी गुणधर्म असणाऱ्या रानभाज्या आढळून येतात. आजच्या धकाधकीच्या काळात रानभाज्यांची माहिती आणि महत्त्व जनतेला कळावे यासाठी राधानगरी तालुक्यात प्रथमच महाराष्ट्र शासनाच्या कृषी व आत्मा विभाग, कृषी विज्ञान केंद्र तळसंदे व स्वर्गीय सुशिलादेवी आबिटकर फौंडेशनच्या वतीने नरतवडे ता. राधानगरी येथील जयभवानी कार्यालयात अत्यंत स्तुत्य असा रानभाजी महोत्सव तसेच ऊस पिक स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ पार पडला आहे.शेतकऱ्यांना एकरी ६० टनापेक्षा अधिक उत्पन्न घेता यावे यासाठी आयोजित ऊस पिक स्पर्धा बक्षिस वितरण समारंभ देखील कौतुकास्पद आहे. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांचे एकरी उत्पन्न हे १२० टनांच्या वर जायला हवे यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना प्रत्यक्ष बांधावर जाऊन मार्गदर्शन करावे, तसेच शेतकऱ्यांनी देखील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, काटेकोर नियोजन, योग्य व्यवस्थापन या त्रिसुत्रीचा वापर केला पाहिजे.”

 

 

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.