आपला जिल्हाकृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दूधगंगा धरण व्यवस्थापन शाखेकडून वृक्षारोपण करून ७८वा स्वातंत्र्यदिन साजरा 

प्रबोधनकार ठाकरे हायस्कूल आणि केंद्र शाळा दूधगंगा नगर यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यदिन संपन्न 

आमचे सर्व अपडेट व्हाटसअप वर मिळवा

दूधगंगानगर/दि.१५ऑगस्ट: 

                 राज्यात पाणी साठ्यानुसार ११व्या क्रमांकावर असलेले व राधानगरी तालुक्यातील सर्वात मोठे धरण म्हणजे काळम्मावाडी धरण. राज्याच्या पश्चिम भागात असणाऱ्या या जलाशयामुळे महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक राज्यातील बराच भाग सुजलाम सुफलाम् केला आहे. देशातील या दोन राज्यांना सुजलाम सुफलाम बनवणाऱ्या दूधगंगा धरणाच्या व्यवस्थापन शाखेकडून देशाचा ७८वा स्वातंत्र्यदिन धरण परिक्षेत्रात वृक्षारोपण करून साजरा कऱण्यात आला.

धरण परिक्षेत्रात वृक्षारोपण करताना धरण शाखेचे शाखा अभियंता नितीन भोजकर व सहकारी त्याच बरोबर दूधगंगा नगर केंद्र शाळेचे विद्यार्थी व शिक्षक वृंद

              आजच्या युगात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षांची नितांत गरज आहे; परंतु मानव आपल्या हव्यासासाठी झाडांची कत्तल करत आहे त्यामुळे माणसाबरोबरच आता इतर प्राण्यांचे जीवन देखील धोक्यात आले आहे. त्यामुळे आता झाडांचे जतन व संवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे. हाच उदात्त विचार अंगिकारत दूधगंगा धरण व्यवस्थापन शाखेचे शाखा अभियंता नितीन भोजकर व त्याचे सहकारी त्याचबरोबर प्रबोधनकार ठाकरे हायस्कूल आणि केंद्र शाळा दूध गंगा नगर यांच्या संयुक्त विद्यमानाने देशाच्या ७८वा स्वातंत्र्यदिन वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. यावेळी दूधगंगा धरण व्यवस्थापन शाखा दूधगंगानगर, प्रबोधनकार ठाकरे हायस्कूल दूधगंगानगर व विद्यामंदिर दूधगंगानगर येथील शिक्षक, कर्मचारीवृंद व विद्यार्थी सहभागी होते.

 

 स्वातंत्र्यदिनानिमित्त दूधगंगा जलाशयावर विद्युत रोषणाई 

देशात सर्वत्र स्वातंत्र्य उत्सव साजरा केला जात असताना त्याच स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला दूधगंगा जलाशयावर विद्युत रोषणाई करण्यात आली. धरण्याच्या पाच गेट मधून संडव्यात पडणाऱ्या पाण्यावर तिरंगी ध्वजाची विद्युत रोषणाई केल्यामुळे जलाशयाचे चित्र समोरून लक्षवेधून घेणारे दिसत होते.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.