ताज्या घडामोडी

विद्यार्थिनींकडून कॉलेजने शुल्क मागितल्यास होणार कारवाई

या संदर्भात सरकारने सुरू केला हेल्पलाईन नंबर

आमचे सर्व अपडेट व्हाटसअप वर मिळवा

 

मुंबई/प्रज्ञावंत वृत्तसेवा /दि.१३ ऑगस्ट:

    महाराष्ट्र सरकारने मुलींना उच्च आणि पदव्युत्तर शिक्षण मोफत केलं आहे. त्यामुळे आता महाविद्यालय मध्ये प्रवेशासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही. मात्र तरीही काही महाविद्यालय त्यांच्याकडून शुल्क वसूल करत आहेत, अशा तक्रारी आलेले आहेत. या विरोधात आता उच्च व तंत्र शिक्षण विभागाने कडक पावलं उचलली आहेत. त्यानुसार जी महाविद्यालय विद्यार्थिनी कडून शुल्क आकारतील त्यांच्या विरोधात तक्रारीकरिता सरकारकडून हेल्पलाइन नंबर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

      यासंदर्भात माहिती व जनसंपर्क महासंचालनालय ट्विट करून माहिती दिली आहे, त्यामध्ये मुलींना मोफत उच्च शिक्षणा संदर्भात समस्या आल्यास सकाळी नऊ ते सायंकाळी सहा पर्यंत

या वेळेत ०७९६९१३४४४० आणि ०७९६९१३४४४१ या हेल्पलाइन नंबर वर संपर्क साधावा तसेच http://helpdesk.maharashtracet.org या हेल्पलाइन वेबसाईटवरही संपर्क साधता येईल. असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण विभागाने केला आहे.

      या योजनेनुसार यावर्षीपासून पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना ट्युशन व परीक्षा फी मध्ये शंभर टक्के सवलत जाहीर केले आहे. त्यामुळे साहजिकच संपूर्ण ती माफ असणार आहे. पण यासाठी पालकांचे वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असणे गरजेचे आहे, यापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थिनींना संपूर्ण फी भरावी लागणार आहे.

      महिला सशक्तिकरणा साठी घेण्यात आलेल्या या पुढाकारामुळे मुलींना केवळ आर्थिक पाठबळ नसल्याने व्यावसायिक शिक्षणाच्या संधी पासून मुकावे लागू नये, हा या मागचा हेतू आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.