आपला जिल्हाक्राईमताज्या घडामोडी

लग्नाचे आमिष दाखवून राधानगरी तालुक्यातील दोन तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक करणारी टोळी अटक 

नववधूसह दोन संशयितांना पकडण्यात राधानगरी पोलीसांना यश 

आमचे सर्व अपडेट व्हाटसअप वर मिळवा

ख. प्रज्ञावंत वृत्तसेवा/दि.29ऑगस्ट: 

      राधानगरी तालुक्यातील मानेवाडी येथील युवक नाथाप्पा शामराव माने (वय २७ ) याचे काही महिन्यांपूर्वी सोनाली निलेश कोल्हाळ (वय २७) रा. मोहोळ ता. मोहोळ जि. सोलापूर यांच्याशी लग्न झाले होते ;परंतु लग्न झाल्याच्या तिसऱ्या दिवशी रात्री साडेबारा च्या सुमारास नववधू नवऱ्या मुलग्याच्या घरातून पसार झाली. त्यानंतर नवऱ्यामुलाच्या घरच्यांनी शोध घेतल्यानंतर  वधूसह  असणाऱ्या एजेंट व मध्यस्ती असणाऱ्या कोणाचाच पत्ता न लागल्याने आपल्यासोबत फसवणूक झाल्याची वर्दी राधानगरी पोलीस स्टेशनमध्ये दिली.

    याबाबत मिळालेली माहिती अशी, राधानगरी तालुक्यातील दुर्गम भागात असणाऱ्या मानेवाडी या गावातील युवक नाथाप्पा शामराव माने यांनी सोनाली कोल्हाळ हिच्याशी लग्न लावून देण्यासाठी सुवर्णा अमोल बागल (वय ३५) व अमोल शहाजी बागल (वय ३२) दोघेही रा. जवाहरनगर नाईकवाडी वस्ती मोहोळ, ता. मोहोळ जि. सोलापूर यांना १,३०,००० रुपये दिले होते. त्याचबरोबर प्रकाश रंगराव चव्हाण रा. बावेली पैकी भाटवाडी ता. गगनबावडा जि.कोल्हापूर व रावसाहेब आप्पासो सरावदेरा (पत्ता अज्ञात) या एजेंटना रुपये ३००००हजार दिले होते. यानंतर दिनांक ११ एप्रिल २०२४ रोजी ठरल्याप्रमाणे नाथाप्पा यांचा विवाह सोनाली हिच्याशी झाला. लग्न होऊन  दोनच दिवस झाल्यानंतर दिनांक १३ एप्रिल रोजी रात्री १२: ३०वा. सुमरास नववधू सोनाली नाथाप्पा यांच्या घरातून पसार झाली. सोबत लग्नात घातलेले स्त्रीधन म्हणून रूपये १८०००किमतीचे सोने – चांदीचे दागिने देखील नेण्यात आले. त्यानंतर वरपक्षाच्या नातेवाईकांकडून शोधाशोध झाल्यानंतर कोणीही हाती न लागल्याने आपल्यासोबत तब्बल १,७८,५०० रूपयांची फसवणूक झाली असल्याची वर्दी त्यांनी दिनांक २८ जुलै रोजी राधानगरी पोलीस ठाण्यात दिली होती.

 असाच प्रकार  याच तालुक्यातील बारडवाडी गावातील  रमेश बारड या तरुणासोबत घडला . याचे लग्न ही राधा देशमुख म्हणजेच सोनाली कोल्हाळ हिच्याशी दिनांक २६ एप्रिल २०२४ रोजी झाले या प्रकरणातही  सुवर्णा बागल व अमोल बागल यांनी लग्न ठरवण्यासाठी बारड कुटुंबियांकडून ६००००  रुपये घेतले. यानंतर दोघांचे मोहोळ येथेच लग्न झाले लग्नावेळी  स्त्रीधन नववधूस ५६००० रुपयांचे दागिने घालण्यात आले. लग्नानंतर वर व वधू वराच्या राहत्या घरी आले. त्यानंतर २७ एप्रिल रोजी रात्री नववधू सोनाली तेथूनही त्याचप्रकारे  २,५६,००० रुपयांच्या दागिन्यांसह पसार झाली. त्यानंतर घडला प्रकार बारड कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर  पांडुरंग  गजानन बारड यांनी राधानगरी पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली. यामध्ये आपल्या सोबत एकूण ४,१६,००० रूपयांची फसवणुक झाल्याबाबत ची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक संतोष गोरे व त्याच्या पथकाने या सर्व प्रकरणाचा तपास करण्यासाठी आपले पथक सोलापूरच्या दिशेने पाठविले परंतु तेथे यांपैकी कोणीही सापडले नाही अखेर खूप प्रयत्नानंतर तीन संशयितांना पकडण्यात पोलिसांना यश आले यांना सदर गुन्ह्याखाली न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे तर आणखी  दोन जणांचा अधिक तपास सुरू आहे.

          दरम्यान लाखो रूपयांची फसवणुक झाल्याने बारड व माने कुटुंबीयांची मोठी हानी झाल्याने त्यांची वाताहत झाली आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.