आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘हर घर तिरंगा’ अभियानात विधवा महिलेचा सन्मान -चांदेकरवाडीचा आदर्श उपक्रम

पत्रकार - उत्तम कांबळे ( केनवडेकर)

आमचे सर्व अपडेट व्हाटसअप वर मिळवा

चांदेकरवाडी/प्रज्ञावंत वृत्तसेवा :

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र ‘हर घर तिरंगा’ अभियान चालू आहे या अंतर्गत १३,१४ व १५ ऑगस्ट रोजी गावपातळीवर विविध उपक्रम घेतले जात आहेत .

      राधानगरी तालुक्यातील चांदेकरवाडी येथेही ‘हर घर तिरंगा’ अभियानामध्ये विधवा महिलांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायत प्रांगणामध्ये तिरंगा ध्वज फडकवण्याची संधी दिली यावेळी श्रीमती शितल विकास खोत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

       समाजामध्ये विधवा स्त्रियांना नेहमीच कमीपणाचे स्थान मिळते पण ,सामाजिक प्रबोधन व जागृतीचे भान ठेवून ग्रामपंचायत चांदीकरवाडीने विधवा महिलेस ध्वजारोहणाचा मान देऊन समाजासमोर एक आदर्श ठेवला. राज्यभरात अनेक ग्रामपंचायतींनी विधवा महिलांचा सन्मानासाठी पुढाकार घेतले आहेत तसेच त्यांना इतरांच्या बरोबरीने समाजात मानसन्मान मिळवण्यासाठी सुज्ञ नागरिक पुढाकार घेत आहेत.

       या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमा वेळी चांदीकरवाडीच्या विद्यमान सरपंच सीमा हिंदुराव खोत, उपसरपंच आनंदा खोत, ग्रामसेवक बाबुराव तावडे, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक वृंद ,विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.