अपघातआपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देवगड – निप्पाणी राज्य मार्गावरील भीषण अपघातात तीन जण ठार तर चौघे जखमी 

अपघातातील सर्वजण सोळांकुर गावचे;सोळांकुर गावावर शोककळा 

आमचे सर्व अपडेट व्हाटसअप वर मिळवा

 

सरवडे/दि.११सप्टें. : बुधवार , दिनांक ११ सप्टेंबर रोजी रात्री १२: ३०च्या सुमारास देवगड – निप्पाणी राज्य मार्गावरील ट्रक व बोलेरो च्या धडकेत तिघेजण जागीच ठार झाले असून चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जिल्हा ग्रामीण रूग्णालय कोल्हापूर येथे उपचार सुरू आहेत.

 या बाबत मिळालेली माहिती अशी, आज रात्री १२:३० च्या सुमारास सोळांकुर गावातील तरूण ऋत्विक राजेंद्र पाटील, भरत तानाजी पाटील, सौरभ सुरेश तेली, संभाजी हणमंत लोहार , रोहन संभाजी लोहार, आकाश आनंदा परीट, शुभम चंद्रकांत धावरे हे सर्वजण महेंद्रा कंपनीची बोलेरो गाडीने (नंबर MH 42H 3064 ) गारगोटीकडून आपल्या गावी सोळांकुर कडे येत होते. दरम्यान सरवडे व मांगेवाडी गावच्या दरम्यान, सरवडे नदीच्या पुलाजवळ पश्चिमेला असलेल्या रस्त्याच्या वळणावर समोरून एक ट्रक (नंबर KA 28AA 8206) आल्याने ट्रक मधील चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने बोलेरो व ट्रक यांची जोराची धडक झाली.

अपघातानंतर बोलेरो गाडीची झालेली अवस्था

 

यामध्ये रोहन संभाजी लोहार, आकाश आनंदा परीट, शुभम चंद्रकांत धावरे हे जागीच ठार झाले तर बाकीचे चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जिल्हा ग्रामीण रूग्णालय (सीपीआर) येथे दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अपघात रात्री घडल्याने अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाल्याने त्यांच्यावर राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे याबात अधिक तपास राधानगरी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार घेरडीकर करत आहेत. 

     रात्री घडलेल्या घटनेची सकाळी लोकांना माहिती मिळताच अपघात घडलेल्या ठिकाणी लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी बोलेरो गाडी चाखनाचुर झालेल्या अवस्थेत दिसत होती तर रस्त्यावर रक्ताचे डाग दिसत होते.

सोळांकुर गावावर शोककळा; संपूर्ण गावात शुकशुकाट 

सध्या सर्वत्र गणपती उत्सव सुरू असल्याने आनंदाचे वातावरण असताना रात्री अचानक सोळांकुर गावातील तरुणांची ही दुःखद बातमी समजताच सर्व गावावर दुःखाचे सावट पसरले आहे. एकाच गावातील हे सात तरूण असल्याने संपूर्ण गावात आज शुकशुकाट पसरला आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.