आपला जिल्हाकृषी व व्यापारताज्या घडामोडी

“झाडे लावून त्याचे जतन व संवर्धन करणे प्रत्येकाची जबाबदारी ” – तहसीलदार अमरदीप वाकडे

केनवडे येथील अन्नपूर्णा शुगर अँड जॅगरी वर्क्स लिमिटेड कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण कार्यक्रमात उद्गार

आमचे सर्व अपडेट व्हाटसअप वर मिळवा

कागल/खरा प्रज्ञावंत वृत्तसेवा:   श्री. अन्नपूर्णा शुगर अँड जॅगरी वर्क्स लिमिटेड कारखान्याच्या कार्यस्थळावरील रस्त्याच्या दुतर्फा वृक्षरोपण करण्यात आले. तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले असून या कार्यक्रमाला गोकुळ चे संचालक अमरिषसिंह घाटगे प्रमुख उपस्थितीत होते.

   यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे यांचा सत्कार माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्या हस्ते कऱण्यात आला. यावेळी कार्यक्रमात बोलताना अन्नपूर्णा शुगर अँड जॅगरी वर्क्स लिमिटेड कारखान्याचे चेअरमन संजयबाबा घाटगे म्हणाले,” निसर्ग आपल्याला खूप काही देतो या भावनेनं प्रत्येकाने कृतज्ञतेने एकदा तरी वर्षातून वृक्षारोपण करावे व त्याचे जतन करावे.”तर कार्यक्रमात बोलताना तहसीलदार अमरदीप वाकडे म्हणाले,” झाडं कमी झाल्याने सर्वानाच त्याचे परिणाम सोसावे लागत आहेत त्यामुळे झाडे लावून त्याचे जतन व संवर्धन करणे प्रत्येकाची जबाबदारी बनली आहे.”

     या कार्यक्रमाला अन्नपूर्णा चे संचालक शिवसिंह घाटगे दिनकर पाटील, विश्वास दिंडोर्ले,राजू भरडे, एम. बी. पाटील, केके पाटील, सरपंच अनुराधा शिंदे, उपसरपंच शुभांगी पाटील, सरपंच सुनिता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.