आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावर्डे – सुळंबी मार्गावर पाणी आल्याने वाहतूक बंद 

पावसाचा जोर वाढल्याने दूधगंगा जलाशयातून ९१००क्युसेक विसर्ग सुरू असल्याने नदीच्या पाणी पात्रात वाढ

आमचे सर्व अपडेट व्हाटसअप वर मिळवा

ख.प्रज्ञावंत वृत्तसेवा/दि.31जुलै : राधानगरी तालुक्यात, गेली बरेच दिवस मुसळधार पाऊस सुरू असल्याने, नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. राधानगरी तालुक्यात ,दूधगंगा नदी काठावर वसलेली, सावर्डे पाटणकर व सुळंबी या गावांना जोडणारा पुल बरेच दिवस पाण्याखाली गेला आहे परंतु आता पावसाचा वाढता जोर, व दूधगंगा जलाशयातून सध्या 9100 क्युसेक इतका विसर्ग सूरु असल्याने , आता सावर्डे – सुळंबी मार्गावर पाणी आले आहे. सध्या नदीचे पाणी पात्राच्या बाहेर पडून नदीकाठच्या शेतमार्गे रस्त्यावर आले आहे. त्यामुळे हा मार्ग बंद झाला आहे.

पावसाचा जोर वाढत राहिला तर पुढील दिवसांत पाण्यात वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या दूधगंगा जलाशयात काल दिवसभरात 90 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे जलाशयात आजरोजी 86.42 टक्के इतका पाणीसाठा आहे. तर पाण्याची पातळी 621.485 द.ल. घ. न. मी इतकी आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.