आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पॅरिस ओलंपिक मध्ये कोल्हापूरचा डंका

कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळे ने पटकावले कांस्य पदक

आमचे सर्व अपडेट व्हाटसअप वर मिळवा

ख.प्रज्ञावंत वृत्तसेवा/दि.०१ ऑगस्ट: पॅरिस येथे सुरु असलेल्या ऑलिंपिक स्पर्धेतील सहाव्या दिवशी  नेमबाजीत पुरुषांच्या पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करत असणाऱ्या स्वप्नील कुसाळे याने कांस्य पदक पटकावले आहे. स्वप्नील ने एकूण ४५१.४ गुणांसह  या स्पर्धेत तिसरे स्थान पटकावले. स्वप्नील हा कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी या लहानशा गावातील तरूण आहे. त्याने केलेल्या या कामगिरीबद्दल देशभरात त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नीलिंग आणि प्रोम प्रकारातील फेरीत स्वप्नील ३१०.१ गुणांसह पाचव्या स्थानावर होता. परंतु स्टँडिंग प्रकारातील पहिल्या आणि दुसऱ्याफेरीत त्याने पुन्हा दमदार कामगिरी करत त्याने तिसरे स्थान पटकावले. मूळचा कोल्हापूरचा असलेल्या स्वप्नील कुसाळेने पात्रता फेरीत चमकदार कामगिरी केली आणि 60 शॉट्समध्ये 590 गुण मिळवले ज्यामध्ये 38 इनर 10चा समावेश होता. (नीलींग या मालिकेत नेमबाज गुडघा जमिनीवर टेकवत नेमबाजी करतो तर प्रोम मालिकेत जमिनीवर झोपून नेमबाजी केली जाते तर स्टँडिंग मालिकेत नेमबाज उभे राहून नेमबाजी करतो.)

 प्रथमच एका ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत तीन पदके

 पहिल्यांदाच भारतीय नेमबाजाने ऑलिम्पिकमधील ५० मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेत पदक जिंकले आहे. चालू ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताचे हे तिसरे पदक होते. याआधी भारताची शेवटची दोन पदके नेमबाजीतही आली होती. म्हणजेच भारताने पहिल्यांदाच ऑलिम्पिक हंगामात नेमबाजीत तीन पदके जिंकली. या स्पर्धेचे सुवर्णपदक चीनच्या लिऊ युकुनने तर रौप्य पदक कुलिश सेरहीने (युक्रेन) पटकावले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.