आरोग्य व शिक्षण

लेझीम च्या तालावर ठेका  धरत विद्यार्थ्यांचे शाळेत आगमन; केंद्रीय प्राथमिक शाळा केनवडे येथे साजरा विद्यार्थी प्रवेशोत्सव

आमचे सर्व अपडेट व्हाटसअप वर मिळवा

कागल/दि.१५जून:  १५ जून रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्राथमिक शाळा सुरू झाल्या. प्रत्येक शाळेत वेगवेगळ्या पद्धतीने हा पहिला दिवस साजरा केला गेला. कागल तालुक्यातील केनवडे येथे ,हा शाळेचा पहिला दिवस आगळ्या – वेगळ्या पद्धतीने साजरा केला गेला. लेझीम च्या तालावर वाजत गाजत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेश केंद्रीय प्राथमिक शाळा केनवडे येथे झाला.

//https://youtu.be/gPyN9VPFfkM?si=-YhkQt9JaEZYaeLY

यावेळी सर्वच मुलांना पुस्तके वाटप व खाऊवाटप करण्यात आला यावेळी केनवडे गावचे सरपंच व उपसरपंच, तसेच सामाजिक कार्यकर्ते ,माननीय श्री दत्ता पाटील यांसह सर्व ग्रामपंचायत सदस्य ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व उपाध्यक्ष ,पालक, ग्रामस्थ  उपस्थितीत  होते. यावेळी नवीनच हजर झालेले मुख्याध्यापक माननीय विजय पाटील सर यांनी सर्वांना  मार्गदर्शन केले तर श्री शेळके सर यांनी सर्व उपस्थितांचे  आभार मानले. शाळेचा पहिला दिवस आणि हा आनंददायी अनुभव पाहून पालकांबरोबर सर्व मुले ही भारावून गेली.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.