ताज्या घडामोडीसामाजीक

महिलांच्या पुढाकाराने सावर्डे पाटणकर येथे २५८६ वी बौध्द जयंती साजरी

आमचे सर्व अपडेट व्हाटसअप वर मिळवा

सावर्डे पा. दि.२३मे: संपूर्ण जगभरात त्याग,शांती व अहिंसेची शिकवण देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची २५८६ वी जयंती राधानगरी तालुक्यातील सावर्डे पाटणकर येथे पार पडली.



विशेष म्हणजे या जयंतीमध्ये महिलांनी प्रथमच पुढाकार घेतला होता. जयंतीच्या व्यवस्थापणापासून ते कार्यक्रमाच्या नियोजनापर्यंत सर्वच गोष्टीत महिलांचा पुढाकार होता. त्यामुळे यावर्षीच्या जयंतीला एक वेगळेच वातावरण निर्माण झाले.


कार्यक्रमास उपस्थित जनसमूह

विशेष म्हणजे या जयंतीला येणारा सर्व खर्च बौध्द समाजातील सर्व महिलांनी आपल्या वैयक्तीक वर्गणीतून करुन अतिशय नियोजनपूर्वक जयंती पार पाडली. सम्राट अशोक बुद्ध विहारात हा कार्यक्रम पार पडला असून या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली.


दीपप्रज्वलन करताना भीम क्रांती तरूण मंडळाचे अध्यक्ष साताप्पा कांबळे

या कार्यक्रमाचे दीपप्रजज्वलन भीम क्रांती तरूण मंडळाचे अध्यक्ष साताप्पा परसू कांबळे व गावच्या लोकनियुक्त सरपंच सुमन विलास मोरे यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या सह महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.



त्यानंतर भारतीय बौध्द महासभेचे सदस्य शिवाजी कांबळे यांच्यासोबत सर्वांनी त्रीसरण पंचशील ग्रहण केले. लहान मुलांसाठी कथाकथन स्पर्धा त्याच बरोबर महिलांसाठी रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्येही महिलांनी चांगला प्रतिसाद दिला. दुपार नंतर च्या सत्रात संगीतखुर्ची व उखण्याचा कार्यक्रम होता परंतु अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळेहा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी पार पडला.

एकंदरीतच सामाजिक चळवळीचा वसा लाभलेल्या या समाजात महिलांनी प्रथमच पुढाकार घेऊन सर्वांना एक आदर्श घालून दिला आहे. असे मत इथल्या समाजातील ज्येष्ठ नागरिकांमधून येत आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.