ताज्या घडामोडीसामाजीक

बार्टी कडून त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांना विनम्र अभिवादन 

आमचे सर्व अपडेट व्हाटसअप वर मिळवा

वसमत( दि.27मे): रमाबाई भिमराव आंबेडकर म्हणजे या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्नी.माता रमाई यांना जीवनात फारच दुःख सहन करावे लागले बाबासाहेब हे शिक्षण घेत असताना रमाईंनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत संसार सांभाळाला म्हणूनच लोक त्यांना त्यामूर्ती म्हणून ओळखतात. 27मे हा दिवस म्हणजे माता रमाईचा स्मृतिदिन. बहुजनांचा आधार वड बनलेल्या बाबासाहेबांच्या जीवनात रमाबाईंचे स्थान फारच महत्त्वाचे आहे त्यामुळे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्याकडून माता रमाबाईंना विनम्र अभिवादन करण्यात आले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोंदे यांच्या मार्गदर्शनाखाली समतादूत मिलिंद आळणे, गुरुनाथ गाडेकर यांनी सर्वप्रथम रमाबाई भिमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले .

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रेमा एंगडे ह्या होत्या प्रमुख पाहुण्या दिव्या गायकवाड, प्रीती इंगळे हया होत्या. होत्या. आर.टी .ई प्रचार प्रसार करण्यात आला.यावेळी दिव्या गायकवाड, प्रिंती इंगळे सोनाबाई गायकवाड, संगीता रणवीर, प्रेमा एंगडे ,मानशी इंगळे ,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.