ताज्या घडामोडीनिधन

राधानगरी बसस्टँड जवळ भीषण अपघातात महिला जागीच ठार 

आमचे सर्व अपडेट व्हाटसअप वर मिळवा

राधानगरी/खरा प्रज्ञावंत वृत्तसेवा (दि.२७मे): 

निपाणी देवगड राज्यमार्गावर राधानगरी बसस्थानकाशेजारी ट्रकच्या धडकेत मोटरसायकलवर मागे बसलेली महिला जागीच ठार झाली.


अपघातानंतर घटनास्थळी जमलेली गर्दी

      याबाबत मिळालेली माहिती अशी, वारणानगर येथून समीर खुदालाला सय्यद व आस्मा समीर सय्यद (वय.37 )रा. अमृत नगर वारणा कोडोली ता पन्हाळा जि. कोल्हापुर हे दांपत्य स्प्लेन्डर मोटरसायकल नंबर-MH 09- FH-5885 यावरून राधानगरी धरण पाहणे करीता निघाले असता राधानगरी एस.टी . स्टॅन्ड चे जवळ असलेले ज्योतिर्लीग भेळचे समोर पाणी पिण्यासाठी थांबले होते यावेळी त्यांचे मोटरसायकलीस पाठीमागुन येणाऱ्या ट्रकची (नंबर MP-09-HG-7801 ) धडक बसल्याने मोटारसायकल वर मागे बसलेल्या आस्मा समीर सय्यद या ट्रकच्या मागच्या चाकाखाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना दुपारी ३ च्या सुमारास घडली. अपघात घडल्यानंतर घटनास्थळी लोकांनी प्रचंड गर्दी केली.त्यानंतर घटनास्थळी पोलीस आल्यानंतर महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राधानगरी ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आला. याबाबत राधानगरी पोलीस स्टेशन मध्ये ट्रक चालकाविरोधात गुन्हा नोंद झाला असून याबाबत अधिक तपास सुरू आहे.



  मृत महिलेचे पती समीर सय्यद हे वारणानगर येथे दूध संघात नोकरीस आहेत. त्याना दोन लहान मुले आहेत. नातेवाईकांकडे सुट्टीसाठी आले असताना काळम्मावाडी धरण पाहून राधानगरी धरण पाहण्यासाठी जात होते. त्यावेळी हा अपघात घडला.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.