ताज्या घडामोडीसाहित्यिक

वाघवडे गावच्या सुमित पाटीलचा राष्ट्रीय स्तरावरील निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक  

आमचे सर्व अपडेट व्हाटसअप वर मिळवा

 खरा प्रज्ञावंत वृत्तसेवा /दि.२ जून : पुणे शहर युवक काँग्रेस तर्फे २६मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत वाघवडे या गावचा सुपुत्र कुमार सुमित पाटील याचा द्वितीय क्रमांक आला असून वाघवडे गावचे नाव पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर चमकले आहे . विविध क्षेत्रातील स्पर्धकांनी भाग घेतलेल्या या स्पर्धेत कुमार सुमित पाटील याने आपल्या निबांधासाठी वैविध्यपूर्ण आशय निवडला होता. पुणे येथील घडलेल्या अपघाताविषयी त्याने आपल्या निबंधात केलेली मांडणी ही परीक्षकांना चांगलीच भावली त्यामुळेच त्याच्या या निबंधाला स्पर्धेत द्वितीय स्थान मिळाले. त्याचा हा निबंध स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कलादालन पुणे येथे लावण्यात आला आहे.



 माननीय मराठी भाषा संमेलनाचे अध्यक्ष तसेच माजी आयएएस अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख तसेच पुण्याच्या माजी महापौर तसेच महाराष्ट्र मंत्री व पुणे युवा काँग्रेस अध्यक्ष राहुल शिरसाट यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.सदरचा निबंध सामाजिक ओपिनियन म्हणून पंतप्रधान कार्यालय दिल्ली महाराष्ट्र मुख्यमंत्री व गृहमंत्री कार्यालयात पाठवण्यात येणार आहे.

  त्याच्या या यशामुळे संपूर्ण गावचे नाव देखील उंचावल्याने सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. सुमितला निबंध लेखनाची आवड येळवडेच्या मराठी शाळेतून आणि नागेश्वर हायस्कूल मधून झाली व आवडीला प्रोत्साहन देण्याचे कार्य त्याचे मामा आणि आई भावाने केले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.