अपघातताज्या घडामोडी

कोल्हापुरात भीषण अपघातात ३ ठार तर ५ जण जखमी 

कोल्हापूर शहरातील सायबर चौकात एका सँट्रो कारने 6 जणांना चिरडल्याची घटना

आमचे सर्व अपडेट व्हाटसअप वर मिळवा

कोल्हापूर प्रतिनिधी(दि. ०३ जून): 

 हा अपघात दुपारी २च्या सुमरास घडला असून या अपघातात इतका भीषण होता की ,दुचाकीस्वार काही फुटांपर्यंत हवेत उडून डांबरीवर आदळले.

यात चालकासह 3 ठार झाले असून 5 जण जखमी झाले आहेत. तर 3 दुचाकी आणि एका कारचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, या घटनेत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अपघातातील कार चालक हे शिवाजी विद्यापीठाचे निवृत्त प्र कुलगुरू होते. अपघातात त्यांचाही मृत्यू झाला आहे.

शहरातील सायबर चौकात दुपारच्या सुमारास चांगलीच वर्दळ असते. दरम्यान, काही लोक दुचाकीवरुन रस्ता ओलांडत होते. यावेळी सर्व वाहनांचा वेग कमी होता. प्रत्येकजण जागा मिळेल तशी वाहने पुढे नेते होते. इतक्यात एका भरधाव वेगाने आलेल्या कारने दोनतीन दुचाकींना जोराची धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील लोक काही फूट फेकले गेले. जोराची धडक बसल्याने काही लोक गंभीर जखमी झाले आहेत. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. सुदैवाने यात एक चिमुरडी वाचल्याचे पाहायला मिळाले. अपघातानंतर स्थानिकांनी जखमींना रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली. मात्र, तिघांना मृत घोषित केलं आहे. राजारामपुरी पोलीस आणि शहर वाहतूक शाखेचे पोलीस वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रयत्न करत होते. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने मोठा गोंधळ उडाला होता.

 कार चालकाची तब्बेत ठीक नसताना गाडी चालवल्याने झाला मोठा अपघात घडला 

वसंत चव्हाण (वय 72) असं मृत्यू झालेल्या कारचालकाचे नाव आहे. त्यांचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. चव्हाण यांना काही आजार होता का? याची चौकशी त्यांच्या कुटुंबीयांकडून आता पोलीस करत आहेत. मयत कार चालक वसंत चव्हाण हे शिवाजी विद्यापीठाचे निवृत्त प्रभारी कुलगुरू होते. शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र कुलगुरू व्ही एम चव्हाण यांचा देखील या अपघातात मृत्यू झाला. व्ही एम चव्हाण तब्येत बरी नसतानाही कार चालवत असल्याची माहिती समोर आली आहे.

मृतहेदांची अवहेलना

कोल्हापूरच्या अपघातात जखमी आणि मयत व्यक्तींना अपघातानंतर साधी रुग्णवाहिका ही मिळाली नाही. त्यामुळे मिळेल त्या गाडीत मृत्युदेह आणि जखमींना ठेवण्याची वेळ पोलिसांवर आणि नागरिकांवर आली. मृत्यूनंतरही अवहेलना झाल्याचा प्रकार यामुळे पुढे आला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे सगळे संताप व्यक्त करत आहेत.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.