ताज्या घडामोडीसामाजीक

बार्टी कडून शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा

आमचे सर्व अपडेट व्हाटसअप वर मिळवा
मी वसमत प्रतिनिधी(दि. ०६जून):

       इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर राज्य करणारा राजा म्हणजे शिव छत्रपती यांचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात बार्टी कडून साजरा करण्यात आला . छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके 1596 म्हणजेच 6 जून 1674 ला स्वतःस राज्याभिषेक करून घेतला आणि एका सार्वभौम राज्याच्या जयघोष केला. कित्येक वर्षे गुलामीत राहिलेल्या मराठी मुलुखात नवचैतन्याचा सोहळा पार पडला. या घटनेला आज रोजी साडेतीनशे वर्षे लोटली.याच दिवसाचे महत्त्व ओळखून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे प्रकल्प अधिकारी सिध्दार्थ गोंवदे यांच्या मार्गदर्शनाखाली समतादूत आळणे मिलिंद यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५१ वा राज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला . या दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून , दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला गेला. त्याचबरोबर समाज कल्याण , सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची ही माहिती देण्यात आली. .

यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहाजी जाधव , विठ्ठल पडोळे ( मुडीकर ) होते. तर प्रमुख पाहूणे म्हणून मदन भाऊ भोसले , विनोद भाकरे यांची उपस्थिती होती.

  त्याचरोबर कार्यक्रमास शंभुराजे मल्टीसर्विसेस वसमत चे प्रो. प्रा. शुभम कदम पिंपराळकर , रजनीकांत कमळू , करण जाधव , मिलिंद आळणे , युवराज सूर्यवंशी , नागनाथ खुळखुळे , विलास भाकरे , अमोल साखरे , विट्ठल पड़ोळे , शहाजी जाधव , रघुनाथ नरवाडे , मदन भाऊ भोसले ,व्यंकटेश जाधव , बाळू खुळखुळे , विनोद भाकरे , विश्वनाथ जाधव , बालाजी साखरे , रघुनाथ कदम , उत्तमराव ठोंबरे मामा , आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी  कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रजनीकांत कमळू यांनी केले .

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.