आपला जिल्हाताज्या घडामोडी

कागल पंचायत समितीमध्ये शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा शाहिरांच्या डफांनी दुमदुमला…

आमचे सर्व अपडेट व्हाटसअप वर मिळवा

कागल/ ७ जून २०२४/ प्रज्ञावंत वृत्तसेवा :
दिनांक ६ जून रोजी कागल पंचायत समितीमध्ये शिवराज्यभिषेक दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक दिनाचे निमित्ताने आयोजित शासकीय कार्यक्रमांमध्ये न्यू गणेश शाहीर पार्टीचे शाहीर विजय तळेकर व पार्टी, रा.केनवडे ता.कागल यांनी शाहिरी पोवाडे सादर केले यामध्ये शिवचरित्रावर आधारित पोवाडे व व्यसनमुक्ती वर आधारित पद ही सादर करण्यात आली. शाहिरी डफ व पोवाड्यांनी वातावरण आनंदमय झाले होते.


या कार्यक्रमाला कागल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बोंगे साहेब, तसेच कागल पंचायत समितीच्या संपूर्ण अधिकारी वर्ग यांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद घेतला.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.