ताज्या घडामोडीसामाजीक

बार्टीकडून संत कबीर जयंती उत्साहात साजरी

आमचे सर्व अपडेट व्हाटसअप वर मिळवा

वसमत: संत कबीर दास भक्ती काळातील प्रमुख कवी होते त्यांनी आपल्या संपूर्ण जीवनात वाईट प्रथा दूर करण्यासाठी काही दोहे आणि रचना केली. कबीर दास यांची रचना आजही प्रसिद्ध आहे.संत कबीर यांनी आपल्या जीवनात समाजातील अंधविश्वासू लोकांपासून दूर जाण्याचा संदेश दिला. त्यांचा हा पर्व धार्मिक मान्यतेनुसार जेष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला येतो.

       महाराष्ट्र शासनाची सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे कडून संत कबीर यांना अभिवादन करण्यात आले. बार्टीचे प्रकल्पधिकारी सिध्दार्थ गोवंदे समतादूत मिलिंद आळणे व गुरूनाथ गाडेकर यांनी सर्वप्रथम संत कबीर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला त्यानंतर पुष्पहार दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली..यावेळी अध्यक्षस्थानी प्रतिभा खंदारे,सोनी आळणे शिक्षिका होत्या.तर इंदूताई खंदारे,अर्चना गजभार,सपना खंदारे, सुरेखा दूध मला,सविता गायकवाड,निकिता गंभीर,शोभा बाई खंदारे,दिपाली गायकवाड,आराधना आळणे यांसह जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन इंदूताई खंदारे यांनी केले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.