कृषी व व्यापार

राधानगरी धरणात 2.19 टीएमसी पाणीसाठा

आमचे सर्व अपडेट व्हाटसअप वर मिळवा

कोल्हापूर, दि. 21 जून : सध्या मृग नक्षत्राला काही दिवसापूर्वीच सुरुवात झाली असून. जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी पावसाने चांगली सुरुवात केली आहे . पावसासाठी ओळख असलेल्या कोल्हापूर  जिल्हयातील राधानगरी तालुक्यात देखील पावसाची उघडझाप सुरू होती परंतु दिनांक २० जून रोजी मात्र  राधानगरी तसेच आसपासच्या परिसरातील गावात चांगली दमदार हजेरी लावली. त्यामूळे आता शेतीच्या कामांना चांगली गती मिळाली आहे. सध्या राधानगरी धरणात 2.19 टीएमसी पाणीसाठा असून इतर धरणातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे.

राधानगरी 2.19 टीएमसी, तुळशी 1.28 टीएमसी, वारणा 10.50 टीएमसी, दूधगंगा 3.29 टीएमसी, कासारी 0.79 टीएमसी, कडवी 1.17 टीएमसी, कुंभी 0.90 टीएमसी, पाटगाव 1.28 टीएमसी, चिकोत्रा 0.50 टीएमसी, चित्री 0.49 टीएमसी, जंगमहट्टी 0.40 टीएमसी, घटप्रभा 0.91 टीएमसी, जांबरे 0.32 टीएमसी, आंबेआहोळ 0.88 टीएमसी व कोदे लघु प्रकल्प 0.03 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.
तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 9.8 फूट, सुर्वे 13.10 फूट, रुई 37 फूट, तेरवाड 32.6 फूट, शिरोळ 22.6 फूट, नृसिंहवाडी 19.6 फूट, राजापूर 8.6 फूट तर नजीकच्या सांगली 7.6 फूट व अंकली 4.9 फूट अशी आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.