आपला जिल्हाकृषी व व्यापारताज्या घडामोडी

राधानगरी तालुक्यात ५९.५ मिमी पावसाची नोंद

जिल्हयात २४ तासात एकूण ४२.४ मिमी पाऊस

आमचे सर्व अपडेट व्हाटसअप वर मिळवा

कोल्हापूर, दि.17 जुलै:  जिल्ह्यात काल दिवसभरात पावसाचा जोर वाढला असून जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यात सर्वात जास्त 96.9मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर राधानगरी तालुक्यात 59.5मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वत्र पावसाची संततधार सुरु झाली असून हवामान विभागाने कोल्हापूर जिल्हाला रेड अलर्ट दिला आहे. पावसाचा जोर वाढल्याने नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.

जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे – हातकणंगले- 24.1 मिमी, शिरोळ -12.6 मिमी, पन्हाळा- 49.3 मिमी, शाहुवाडी- 75 मिमी, राधानगरी- 59.5 मिमी, गगनबावडा- 96.9 मिमी, करवीर- 29.3 मिमी, कागल- 39.7 मिमी, गडहिंग्लज- 31.1 मिमी, भुदरगड- 63.5 मिमी, आजरा- 43.8 मिमी, चंदगड- 47.3 मिमी असा एकूण 42.4 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.