आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

विशाळगडावरील धार्मिक वाद घडवून आणणाऱ्या घटनेचा भारतीय दलित महासंघाकडून निषेध 

दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत कांबळे (आप्पा) यांचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन

आमचे सर्व अपडेट व्हाटसअप वर मिळवा

कोल्हापूर, दि. १९ जुलै: काही दिवसांपूर्वी काही हिंदुत्ववादी संघटनांकडून व कोल्हापूरचे संभाजी महाराज छत्रपती यांनी विशाळगड अतिक्रममुक्त करण्यासाठी आंदोलन छेडले होते. त्यानंतर १४ जुलै रोजी विशाळगडाच्या पायथ्याशी जमलेल्या शिवभक्त व अनेक हिंदुत्ववादी संघटना एकत्र आल्या. एकत्र आलेल्या जमावातीतीलच काही लोकांनी विशालगडाजवळ राहायला आसलेल्या स्थानिक लोकांना मारहाण केल्याने संघर्ष विकोपाला गेला व त्यातूनच अतिक्रमणाचा विषय बाजुला राहून हिंदू – मुस्लिम वाद पेटला. झालेल्या या घटनेचा दलित महासंघाकडून निषेध करण्यात आला असून याबाबत उपविभागीय अधिकारी शाहूवाडी यांना निवेदन देण्यात आले आहे.

      या निवेदनात विशाळगडकोट किल्ल्यावरील मल्लिक रेहान बाबा दर्गा या हिंदू – मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या दर्ग्यावर दगडफेक करून अतिक्रमणाशी संबंध नसलेल्या मुस्लिम बांधवांना व पोलीस प्रशासनाला जाणीवपूर्वक लक्ष करून विविध गैरमार्गाने दहशत करणाऱ्या समाजकंटकांचा जाहीर निषेध करण्यात आला आहे. त्याच बरोबर विशाळगड किल्ल्यावरील सिद्ध झालेल्या न्यायप्रविष्ठ अतिक्रमणावर शासन, महसूल प्रशासन व पोलीस यंत्रणा कारवाई करेल परंतु सदरच्या अतिक्रमणाला जातीय रंग देऊन सर्वसामान्य नागरिक, स्त्रिया, लहान मुले यांचेवर दगडफेक, जाळपोळ व तलवार हल्ला करून दहशत माजवणे निषेधार्य आहे. छत्रपती शिवरायांच्या धर्मनिरपेक्ष विचारांवर हा घाला आहे. शासनाने या निंदनीय घटनेची संवेदनशील रित्या गांभीर्याने दखल घेऊन जाणीवपूर्वक दहशत माजविणाऱ्या समाजकांटकांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.