आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राधानगरी धरणातून 1450 क्युसेक विसर्ग  

जिल्ह्यातील 75 बंधारे पाण्याखाली

आमचे सर्व अपडेट व्हाटसअप वर मिळवा

   कोल्हापूर/ख .प्रज्ञावंत वृत्तसेवा (दि.२१जुलै):

जिल्ह्यातील राधानगरी धरणात 6.08 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1450 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व रुकडी, ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, न्हावेली, उमगाव, कोकरे व कोवाड वेदगंगा नदीवरील- म्हसवे, शेणगाव, गारगोटी, निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, चिखली व करडवाडी हिरण्यकेशी नदीवरील – साळगांव, विलजी, ऐनापूर व गिजवणे, दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, सिध्दनेर्ली, सुळकूड व बाचणी कडवी नदीवरील- भोसलेवाडी, कोपार्डे, शिरगाव, सवते सावर्डे व सरुड पाटणे, वारणा नदीवरील -चिंचोली, तांदूळवाडी, कोडोली, माणगाव, खोची व शिगाव भोगावती नदीवरील- हळदी, राशिवडे, सरकारी कोगे, शिरगाव व तारळे कुंभी नदीवरील- कळे, शेनवडे, मांडुकली व वेतवडे कासारी नदीवरील- येवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, कांटे, वालोली, बाजार भोगाव,पेंडाखळे, करंजफेण, कुंभेवाडी, सुसकेवाडी, नवलाचीवाडी-1 व नवलाचीवाडी-2 धामीण नदीवरील- सुळे, पनोरे व आंबर्डे घटप्रभा नदीवरील- हिंडगाव, कानडे-सावर्डे, आडकुर, तारेवाडी, कानडेवाडी, बिजूर भोगोली व पिळणी, तुळशी नदीवरील – बीड असे एकूण 75 बंधारे पाण्याखाली आहेत.

आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी 6.08 टीएमसी, तुळशी 2.25 टीएमसी, वारणा 23.54 टीएमसी, दूधगंगा 13.95 टीएमसी, कासारी 1.96 टीएमसी, कडवी 2.23 टीएमसी, कुंभी 1.63 टीएमसी, पाटगाव 3.06 टीएमसी, चिकोत्रा 0.77 टीएमसी, चित्री 1.59 टीएमसी, जंगमहट्टी 1.22 टीएमसी, घटप्रभा 1.56 टीएमसी, जांबरे 0.82 टीएमसी, आंबेआहोळ 1.18 टीएमसी, सर्फनाला 0.46 टीएमसी व कोदे लघु प्रकल्प 0.21 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 35.5 फूट, सुर्वे 33.6 फूट, रुई 63 फूट, इचलकरंजी 58.3 फूट, तेरवाड 52 फूट, शिरोळ 42.6 फूट, नृसिंहवाडी 41 फूट, राजापूर 30.1 फूट तर नजीकच्या सांगली 14.9 फूट व अंकली 18.11 फूट अशी आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.