आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दूधगंगा जलाशय ५९.१3 टक्के भरले

राधानगरी तालुक्यात दिवसभरात ४०मिमी पावसाची नोंद 

आमचे सर्व अपडेट व्हाटसअप वर मिळवा

राधानगरी/ प्रतिनिधी(दि. २१ जुलै) : कोल्हापूर जिल्हयात सर्वत्र गेली चार दिवस पावसाचा जोर कायम असून जिल्हयातील बरीच बंधारे पाण्याखाली गेली आहेत. राधानगरी तालुक्यात देखील पावसाचा जोर कायम असल्याने राधानगरी धरणाची पातळी आता वाढत आहे; परंतु राधानगरी तालुक्यातच काळम्मावाडी येथे असलेला दूधगंगा जलाशय आजपर्यंत केवळ ५९.१३ टक्के भरला आहे. सध्या जलाशयात १५.०१ टीएमसी पाणीसाठा आहे.

व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.



 

सध्या धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून धरण साठ्यातील पाण्यात वाढ होत आहे. आज दिवसभराच्या मिळालेल्या माहितीप्रमाणे दूधगंगा जलाशयाची पाणीपातळी ४२५.२३० मीटर इतकी वाढली असून पाण्याची एकूण पातळी ६३६.४० मीटर इतकी आहे. तर आज दिवसभरात तालुक्यात ४० मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे पावसाचा जोर कायम राहिला तर येणाऱ्या काही दिवसात हा जलाशय पूर्ण क्षमतेने भरेल. सध्या या जलाशयाचा गळतीचा प्रश्न आजपर्यंत कायम असून या कामासाठी आजपर्यंत कोणताही निधी उपलब्ध नसल्याची माहिती म्हटले जात आहे. त्यामुळे यंदाही गळतीचा प्रश्न कायम आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.