आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राधानगरी धरण ९० टक्के भरले 

राधानगरी तालुक्यात आज दिवसभरात ४९ मिमी पावसाची नोंद 

आमचे सर्व अपडेट व्हाटसअप वर मिळवा

राधानगरी/प्रतिनिधी(दि.२३जुलै) : सध्या राधानगरी तालुक्यात मुसळधार पावस सुरू असल्याने राधानगरी तालुक्यातील राधानगरी धरण ९०.०५ टक्के भरले आहे. आज सायंकाळी ४ च्या अहवालानुसार सध्या राधानगरी धरण ९०टक्के भरले असून धरणात सध्याचा पाणीसाठी ७५०४.४८ द. ल. घ. फू. इतका आहे तर सद्याची पाणीपातळी ३४२.९० फूट. इतकी आहे. सध्या धरणातून १५०० क्युसेक विद्युत विसर्ग सूरू आहे.

     प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांचेकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यामध्ये दिनांक २४ ते २८ जुलै रोजी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच दिनांक २४ ते २८ जुलै रोजी तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पाऊसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुढील ५ दिवस कमाल तापमान २७ ते २८ अंश सेल्सिअस दरम्यान तर किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस दरम्यान राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९५ ते ९७% व दुपारची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९४% दरम्यान राहण्याची शक्यता आहे.वा-याचा वेग २० ते २८ कि.मी./तास पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.