ताज्या घडामोडीसामाजीक

भारतीय बौद्ध महासभा व बार्टी यांच्या संयुक्त वतीने राजर्षी शाहू महाराज 150वी जयंती साजरी 

आमचे सर्व अपडेट व्हाटसअप वर मिळवा

 वसमत दि.२६ जून ः संबोधी बुद्ध विहार हर्षनगर येथे राजर्षी शाहू महाराज जंयती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध ,राजर्षी शाहू महाराज ,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्यहार अर्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आले.त्रिशरन व पंचशील सामुहिक रित्या ग्रहण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक गजभारे सर यांनी केले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नवनाथ भारशंकर होते.याप्रसंगी मेजर भगवानराव सुर्यतळ,के.पि.पंडित,आर.एस. सरोदे, मिलिंद आळणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणेम्हणून आळणे मिलिंद समतादूत उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आर.एस.नंद यांनी केले.आभारप्रदर्शन साहेबराव सरोदे यांनी केले.कार्यक्रमासाठी इंगोले, मेजर सुर्यतळ सर, नवनाथ भारशंकर,यादव चौरे, भिमराव शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.