ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या परदेशी शिक्षण योजनेतील जाचक अटी शिथील   

सम्यक सल्लागार समितीच्या निवेदनाची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल 

आमचे सर्व अपडेट व्हाटसअप वर मिळवा

नांदेड प्रतिनिधी(दि.२९जून) – रितेशकुमार सोनकांबळे 

 महाराष्ट्रातील अनेक तरुण शिष्यवृत्तीच्या जोरावर पदवीपर्यंत शिक्षण घेतात. याच शिष्यवृत्तीच्या जोरावर परदेशातही शिक्षण घेऊन भरारी घेता येईल, याची अनेकांना कल्पनाही नसते. परदेशी शिक्षणाचा सर्व खर्च पेलवत नसल्यामुळे त्यांना शिक्षणासाठी परदेशात जाता येत नाही. यासाठी राज्य सरकारने अनुसूचित – जमातीच्या मुलामुलींना परदेशी शिक्षण घेता यावे यासाठी ‘ राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे; परंतु यात काही जाचक अटी असल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही परिणामी बऱ्याच विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे, हीच बाब ओळखून सम्यक सल्लागार समिती महाराष्ट्र प्रमुख महेश भारतीय सर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी भोकर जिल्हा नांदेड यांना निवेदन सादर करण्यात आले होते.


जिल्हा अधिकारी कार्यालय नांदेड यांना सादर करताना सम्यक जिल्हा कमिटी

तसेच संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातून अशाप्रकारे निवेदन देण्यात आले. हे निवेदन राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या नावे असून त्यामध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती मधील काही जाचक अटी शिथील करण्यात याव्यात अशा पद्धतीने मागणी केली होती. याच निवेदनाची दखल घेऊन आता या योजनेतील काही अटी आता शिथील करण्याबाबत मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे एकंदरीतच सम्यक सल्लागार समिती च्या या कार्याला यश आले असून कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.