कृषी व व्यापारताज्या घडामोडी

सावर्डे पाटणकर गावच्या नवीन नकाशाचे तहसिलदार अनिता देशमुख यांच्या हस्ते ओपनिंग 

तहसिलदार अनिता देशमुख यांसह मंडल अधिकारी विद्या सुर्यवंशी यांची ही उपस्थिती 

आमचे सर्व अपडेट व्हाटसअप वर मिळवा

सावर्डे पा. /दि.२८जून :

        राधानगरी तालुक्यातील सावर्डे पाटणकर गावच्या तलाठी कार्यालयात दिनांक २८जून रोजी गावच्या नवीन नकाशाचे ओपनिंग कऱण्यात आले. या कार्यक्रमासाठी राधानगरी तालुक्याच्या तहसिलदार अनिता देशमुख उपस्थित होत्या. यावेळी त्यांचे स्वागत मंडल अधिकारी विद्या सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर तहसिलदार अनिता देशमुख यांच्या हस्ते भिंतीवरील नकाशा फलक फित कापून सर्वांसाठी खुला कऱण्यात आला.


नकाशाचे फित कापून ओपनिंग करताना तहसिलदार अनिता देशमुख

       पूर्वी सावर्डे पाटणकर व त्या गावालगत असलेले ढेंगेवाडी गाव यांची गटग्रामपंचायत होती. काळानुसार दोन्हीं ही गावांचा विस्तार झाला व कालांतराने दोन्ही ही गावाच्या स्वतंत्र ग्रामपंचायती झाल्या; परंतु त्यावेळी असलेल्या नकाशाच्या नोंदी मात्र आहे तशाच राहिल्या आता दोन्ही गावांचा स्वतंत्र नकाशा झाल्यामुळे नागरिकांना अडचणी येणार नाहीत, असे मत यावेळी बोलताना गावचे तलाठी श्री. डी. व्ही. कांबळे यांनी व्यक्त केले.


तहसिलदार देशमुख मॅडमांचे स्वागत करताना मंडल अधिकारी विद्या सुर्यवंशी

या कार्यक्रमाला सावर्डे पा. गावचे माजी पोलीस पाटील कृष्णात मोरे यांचेसह सुरेश कवडे तसेच गावातली ज्येष्ठ मंडळी देखील उपस्थित होते.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.